मुंबई : देगलूर-बिलोली मतदारसंघाचे काँग्रेसचे दिवंगत नेते रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे दुर्दैवाने एकाच वर्षात महाराष्ट्रात दुसरी पोटनिवडणूक लागली. काँग्रेस पक्षाकडून दिवगंत रावसाहेब अंतापूरकर यांचे पुत्र जितेश अंतापूरकर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले गेले. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील यशामुळे उत्साहात असलेले महाराष्ट्रातील भाजपचे शीर्ष नेतृत्व देगलूरमध्ये राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करणार हे साहजिकच होते. निवडणूक लागल्यावर लगेचच भाजपने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपमध्ये घेऊन त्यांची उमेदवारी जाहीर केली. याबरोबरच ही पोटनिवडणूकही चुरशीची होणार हे निश्चित झाले.
Ringside Research is a nonpartisan opinion research and polling company that specializes in the collection, publication, and distribution of public opinion polling information. We strive to generate original, relevant, timely, and accurate data.
All Rights Reserved to Ringside Research & Media LLP