मुंबई : लोकसभा निवडणुकrत महाराष्ट्रातील 48 जागांचा “रिंगसाईड रिसर्च “चा एक्झिट पोल समोर आला आहे . या पोलनुसार ही महायुतीला जोरदार धक्का बसताना दिसतोय. तर महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळत असल्याचे समोर येते आहे. मविआला 29, महायुतीला 18 तर अपक्षाला 1 जागेवर यश मिळेल असा रिंगसाईड रिसर्च चा अंदाज आहे.
देशाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त चर्चेत असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे महाराष्ट्रात नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. खरी शिवसेना कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कोणाची याचाही निर्णय जनतेच्या न्यायालयात होईल असं सांगितलं जात होतं. त्यामुळे महाराष्ट्राचे एक्झिट पोलचे आकडे नेमके काय दर्शवतात याची उत्सुकता होती. त्यात “रिंगसाईड रिसर्च ” च्या एक्झिट पोल मध्ये महायुतीची जोरदार पीछेहाट होताना दिसते आहे.
Ringside Research is a nonpartisan opinion research and polling company that specializes in the collection, publication, and distribution of public opinion polling information. We strive to generate original, relevant, timely, and accurate data.
All Rights Reserved to Ringside Research & Media LLP